बोडखा ते कोसरसार पुलावरून मुसळधार पाऊसमुळे पाणी वाहत असून एक आई आपल्या बाळाची प्रकृती ठीक नसल्यामुळे पूर आलेल्या पुलावरूनच मार्ग करून ओलांडून गेली. तर दुसऱ्या घटनेत बोडखा येथील गर्भावती महिला बोडखा गाव ते कोसरसर रस्त्यावरील नाल्याला पुराचा पाणीप्रवाह वाढल्यामुळे रुग्णवाहिका येऊ शकली नाही. त्यामुळे प्रसूती रुग्णाला ग्रामस्थांच्या मदतीने पुरामधून जीवघेणा प्रवास करावा लागला. दुर्दैवाने या प्रवासादरम्यान आज दि. 2 सप्टेंबर ला 10 वाजता बाळ पोटातच मृत्यूमुखी पडले.