महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी सेवकाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आज सकाळी ११ वाजतापासून दर्यापूर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. कोतवालांच्या हक्काच्या मागण्यांना शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने नाराज कोतवाल बांधवांनी एकत्र येत आज आपला रोष व्यक्त केला. आंदोलनात वक्त्यांनी सांगितले की,महसूल विभागातील कोतवाल हे ग्रामपातळीवर नागरिकांना थेट सेवा देणारे कर्मचारी आहेत