औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या मार्गावर धार फाट्याजवळ दिनांक 31 ऑगस्ट रविवार रोजी दुपारी एक वाजे दरम्यान दुचाकी क्रमांक एमएएच २२ बीडी २४९२ व कार क्रमांक एमएएच २० जीझेड २३३५ ची समोरासमोर धडक होऊन दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आनंद दिलीपराव सुकळे वय अठरा वर्ष राहणार बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे ते जिंतूर कडे जात होते त्यांना तात्काळ जगद्गुरु नरेंद्रचार्य संस्थान अंबुलन्सने औंढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले