क्रांतीयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या बेमुदत उपोषणादरम्यान राज्य सरकारने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलकांची कोंडी केली होती. या दरम्यान मराठा समाज बांधव या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मोर्चा, राजधानी सातारातर्फे रविवारी दुपारी साडेबारा वाजता ल्हासुर्णे येथील निवासस्थानी विशेष गौरव करण्यात आला.