औसा :-लातूर जिल्ह्यात गेल्या चार दिवस धो धो पाऊस पडला असून यामुळे शेतकऱ्याचे व घराचे मोठे नुकसान झालेले असून या झालेल्या अतिवृष्टीमुळे औसा तालुक्यातील चार महसुल मंडळात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाले व ओढे अद्यापही वाहत असून हे पाणी शेतात शिरले असून अद्यापही शेतशिवार पाण्यातच आहेत.औसा तालुक्यात दि. २७ व २८ व २९ ऑगस्ट या तीन दिवसात सततधार मुसळधार पाऊस झाला.