जुने शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लैंगिक अत्याचार करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी (८ सप्टेंबर) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत महिला व बालकल्याण भवनासमोर तीव्र आंदोलन केले. डाबकी रोड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला असून आरोपी फरार आहे. आंदोलनकर्त्यांनी अत्याचारासोबतच महागाई कमी करणे, प्रोत्साहन भत्ता, पेन्शन, उपदान, ग्रॅच्युइटी लागू करणे यांसह अनेक प्रलंबत प्रश्न सोडवण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झ