यावल येथील नगर परिषद मध्ये स्थापत्य अभियंता संग्राम शेळके यांच्याकडे नागरिकांनी निवेदन दिले. या त्यांनी म्हटले आहे की मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शहरात मोकाट कुत्रे प्रचंड वाढले आहेत. मोकाट कुत्र्यांची भीती आता शालेय विद्यार्थी आणि घराबाहेर खेळणाऱ्या बालकांमध्ये वाढली आहे. तेव्हा या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.