कंधार तालुक्यातील मौजे वाघदरा शिवार येथे दि ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास यातील मयत नामे गौतम हनमंत मस्के वय २५ वर्षे हा मित्रासोबत वाघदरा पुलावर मासे पकडण्यासाठी गेला असता मासे पकडून परत येत असताना विद्युत शाॅक लागून मरण पावला. याप्रकरणी खबर देणार ज्ञानेश्वर मस्के यांनी दिलेल्या खबरीवरून आज दुपारी कंधार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राठोड आज करीत आहेत.