अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे तूर, कपाशी आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लाखपुरी सर्कलमधील सांगवा मेळ गावात महाराष्ट्राचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याशी चर्चा करून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली. यावर पालकमंत्री फुंडकर यांनी संबंधित सूचना दिल्या