दहिगाव या गावात इम्रान पटेल या तरुणाची ज्ञानेश्वर पाटील व गजानन कोळी यांनी हत्या केली होती. सदर तरुण हे अटकेत आहे तेव्हा या तरुणाच्या कुटुंबातील एकाच्या वडिलाने मयत पटेल यांच्या कुटुंबास शिवीगाळत करून धमकी दिली तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस कायदेशीर कारवाई करतील व दहिगाव गावात ऑपरेशन वॉश आऊट राबवले जाईल असे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सांगितले आहे.