गणेश उत्सव,ईद हे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत.त्यामुळे या दिवसांमध्ये परिसरात शांतता निर्माण व्हावी,सर्व सण उत्सव आनंदात साजरे हवेत यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असते.मात्र जर या दिवसांमध्ये काही अनुचित प्रकार घडला तर त्याचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे की नाही याचा सामना करण्यासाठी पोलीस मॉकड्रिल करत असतात.त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक अनोखे मॉकड्रिल केले आणि या अनोख्या मॉकड्रिलने सर्वांचे लक्ष वेधले.