पवित्र ईद-ए-मिलाद या उत्सवाच्या औचित्याने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचा सुंदर संदेश दिला. आंबेडकर चौक, राजुरा येथील राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्वागत मंडपातून त्यांनी सर्व मुस्लीम बांधवांचे आत्मीय स्वागत केले. बंधुता, शांतता आणि प्रेम यांचे प्रतीक असणाऱ्या या सणानिमित्त धोटे यांनी आज दि 5 सप्टेंबर ला 12 वाजता उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.