आर्वी, आष्टी, कारंजा भागात जोरदार मुसळधार पावसाने वर्धा नदीला तसेच या भागातील लहान मोठया नदया व नाल्यांना मोठया प्रमाणात पूर आलेत. तसेच उर्ध्व वर्धा धरणातून नदीत पाणी सोडण्यात येत असल्याने वर्धा नदी आधीच दुथडी भरुन वाहत होती. अशा परिस्थितीतकाल या भागात जोरदार आभाळ फाटल्यागत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या भागात नदी नाल्यांना पूर येऊन नदीपात्राबाहेर लोकांच्या शेतात मोठया प्रमाणात पाणी आले व सखल भागात सुध्दा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली.खा. अमर काळे यांनी या भागाची पाहणी केली.