अकोट शहरा बाहेर जाणारा अकोला मार्ग, हिवरखेड रोड, पोपटखेड रोड, अंजनगाव मार्ग तसेच शहरा बाहेरून शहरात येणाऱ्या मार्गावर वाहन चालकांनी हेल्मेट वापरण्याबाबत ग्रामीण पोलीस ठाणेदार किशोर जुनगरे यांनी वाहन चालकांना आवाहन केले आहे अपघाताचे प्रमाण टाळून वाहतूक नियम पालनासाठी देखिल पोलिसांनी आवाहन केले आहे विना हेल्मेट वाहन चालक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते असा इशारा यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार किशोर जुनगरे यांनी दिला आहे.