आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान हदगाव तहसील कार्यालय येथे हैद्राबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाचा समावेश एस टी प्रवर्गात करावा या मागणीसाठी बंजारा समाजातर्फे तहसील कार्यालय हदगाव येथे मोर्चा काढण्यात आला. हैद्राबाद गॅझेट नुसार त्यानंतर बंजारा समाजाचे एक जात प्रमाणपत्र व्हायरल होत आहे. बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात असल्याचे हे प्रमाणापत्र आहे. या नंतर पुन्हा एकदा बंजारा समाज एस टी प्रवर्गात समाजाचा समावेश करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरलाय.