लातूर -लातूर शहराच्या लगत असलेल्या महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत हद्दीतील म्हाडा कॉलनी,पापड कॉलनी व शिक्षक कॉलनी शेजारील रहिवाशी हे गेल्या पंधरा वर्षापासून मूलभूत सुविधांपासून वंचित असून येथील नागरिकांना अद्यापही ग्रामपंचायत कडून कुठल्याही नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.अनेक वेळा निवेदन देऊनही येथील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या व्यथांचे निवेदन दिले