मेघे संस्थेद्वारे ज्ञानदानाचे व आरोग्यसेवेचे व्रत सातत्याने जोपासण्यात आले आहे. ही सामाजिक, सांस्कृतिक परंपरा निरंतर जोपासली जावी, अशी सदभावना दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी सावंगी येथे सांस्कृतिक महोत्सवानिमित्त दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सावंगी मेघे येथे श्रीगणेशाच्या स्थापना प्रसंगी व्यक्त केली.