पूर्णा तालुक्यातील कौडगाव शिवारात थूना नदी मध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या चार जणांना पूर्णा व परभणी रेस्क्यू टीमने 15 तासानंतर सुखरूप बाहेर काढले. पुर्णा शिवारात समृद्धी महामार्गाचे काम चालू असून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामान व मशनरी असून सदर मशनरी थूना नदीच्या पाण्यामध्ये अडकल्यामुळे काल शुक्रवार 12 सप्टेंबर पासून सदर मशिनरीवर 04 मजूर अडकलेले होते, त्या अडकलेल्या मजुरांना सुखरूप वाचवण्यात आले.