भद्रावती शहरातील बगडे वाडी येथील नागरीक कित्येक वर्षांपासून पक्के रस्ते तथा नाल्या या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ते व नाल्या नसल्याने वार्डात घाणीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.याचा विपरीत परिणाम वार्डातील नागरीकांच्या आरोग्यावर होत आहे.त्यामुळे वार्डात पक्के रस्ते व नाल्या बांधाव्यात अशी मागणी वार्डातील नागरीकांनी नगर परिषद कार्यालयात दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदन आ. करण देवतळे यांनाही सादर करण्यात आले आहे.