आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप आले आहे.मात्र,मैदानातील दयनीय परिस्थितीमुळे आंदोलकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.आझाद मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार प्रशासनाने बंद करून टाकले असून, मैदानात पाण्याचा निचरा न झाल्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे.साध्या वीज व्यवस्था देखील नाही.परिसरातील सार्वजनिक शौचालयांना कुलुपे लावण्यात आली आहेत. तसेच हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.