गोळेगाव येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली पाहणी परतुर तालुक्यामधील गोळेगाव या ठिकाणी 23 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने गावामध्ये पाणी शिरले त्याचप्रमाणे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 24 सप्टेंबर दुपारी एक वाजता जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी पाहणी केली