अष्टापूर फाटा, पिंपरी सांडस येथे श्री महालक्ष्मी मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी नवीन, जुने मोबाईल, लॅपटॉप तसेच अक्सेसरीज, सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण एक लाख ४ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सतीश डुबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.