गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी अमरावती महानगरपालिका सातत्याने जनजागृती करत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (पी.ओ.पी.) पासून तयार होणाऱ्या मूर्ती या पाण्यात सहज विरघळत नसतात आणि त्यावर वापरण्यात येणारे रासायनिक रंग निसर्गाला हानी पोहोचवतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मातीच्या गणेशमूर्तींचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी महानगरपालिकेने मूर्तिकार संघटनांच्या सहकार्याने विविध उपाययोजना राबवल्या आहेत.महानगरपालिकेच्या या प्रयत्नांना चांगले यश मिळाले असून, मूर्तिकार संघटनांनी मातीच्या