रायगड जिल्हा माहिती कार्यालय, अलिबाग येथील जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनीषा पिंगळे यांची प्रशासकीय बदली होऊन दिल्ली येथे नियुक्ती झाल्याने त्यांना आज सायंकाळी पाच वाजता भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील मान्यवर, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व सहकारी कर्मचारी उपस्थित होते.त्याचप्रमाणे माहिती अधिकारी श्री.किरण वाघ यांची पदोन्नती होऊन जिल्हा माहिती अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांची मंत्रालयात बदली झाली आहे. या निमित्ताने पत्रकारांनी वाघ यांचे अभिनंदन केले.