सकाळच्या सुमारास कल्याण कडून पनवेल कडे येणाऱ्या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने स्टेरिंग बाजूला करून रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीकडे नेली आणि भिंतीला आढळून बसचा भीषण अपघात झाला. जवळच रिक्षा स्टॅन्ड आणि बस थांबा होता त्या ठिकाणी मोठी गर्दी होती त्यामुळे चालकाने धोका लक्षात घेऊन संरक्षण भिंतीकडे बस नेल्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे. अन्यथा बस रिक्षा स्टँड आणि बस थांबल्यावर गेली असती तर मोठी जीवित हानी झाली असती.