लातूर : लातूर शहर हद्दीतील प्लॉटच्या गुंठेवारी करणे बंद असल्याचे महानगरपालिका नगररचना विभागाकडून कळविण्यात आले आहे. यामुळे सद्या प्लॉट खरेदी, विक्री, बांधकाम परवाने बंद आहेत यामुळे गुंठेवारीस मुदतवाढ देण्यात यावी, दीडशे ते तीनशे चौरस मीटरपर्यंतच्या घर बांधकामांना खाजगी अभियंत्यांच्या मंजुरीवर परवानगी देण्यात यावी अशी मागणी इंजिनिअर्स असोसिएशन लातूरच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.