घोडसगाव येथे ज्ञानेश्वर श्रीकृष्ण कवडे वय ४० यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने विहिरीतून काढून उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.