मान्सूनच्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ सुरू असून, धरणातील जलसाठा गुरुवारी 95.32% वर पोहोचला असल्यामुळे जायकवाडी धरणातून गोदावरीच्या पात्रात गुरुवारी सकाळी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाणे उचलून गोदावरी नदीपात्रात 9432 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांसह गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क रहावे, असा इशारा कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे.