एकीकडे नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.पुरामुळे एकट्या मुखेड तालुक्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं असताना दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान सिडको येथे नांदेड मध्ये भाजपने दही हंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लाखो रुपये देऊन गौतमी पाटील हिला आमंत्रित करण्यात आले होते. मराठी गाण्यावर गौतमी पाटील हिने नृत्य सादर केले. यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजप वर केली टीका