मोरारजी देसाई वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना उप्पीट खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडली.या घटनेत शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत 60 हून अधिक विद्यार्थी उलटी,जुलाब, पोटदुखी यांसारख्या लक्षणांनी त्रस्त होऊन अस्वस्थ झाले असल्याची माहिती आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शाळेतून मिळाली आहे.वस्ती शाळेत एकूण 400 विद्यार्थी शिक्षण घेत असून सकाळच्या नाश्त्यानंतर काही वेळातच ही लक्षणे दिसून आली.