रावेर तालुक्यात सावदा शहर आहे.या शहरातून पिंपरूड जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरील स्मशानभूमीच्या पुढे दुचाकी क्रमांक एम. एच.१९ ई. क्यू.२८१० द्वारे साजिद शेख वय ३४ हा तरुण जात होता त्याला पांढऱ्या रंगाच्या तवेरा कारद्वारे येऊन पाच जणांनी अडवले. त्याला पिस्तूलचा धाक दाखवला आणि त्याच्याजवळ दीड लाखाची रोकड लांबवली. तेव्हा या प्रकरणी सावदा पोलिसात पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.