सकल बंजारा समाज बांधव सेनगांवच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन आज तहसीलदार सेनगांव यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा आरक्षणाचा लाभ देणे सह विविध मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या. हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज एसटीमध्ये म्हणजे अनुसूचित जमातीत असल्याच्या नोंदी आहेत त्या धर्तीवर बंजारा समाजांना एसटी आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली आहे. यावेळी बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.