संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जन साजरे होत आहे आणि अकोला शहरातही गणेश विसर्जन सुरू झाले आहे. अकोला शहरातील जय हिंद चौक पासून सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी मिरवणुकीला सुरूवात झाल्याचे दिसून येते.. अकोला शहरात प्रथम पूजा केल्या जाणाऱ्या मानाचा श्री १२ भाई गणेशाची पूजा केली जात आहे.. अकोला शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन १२ भाई गणेशाच्या पूजेपासून सुरू होण्याची जुनी परंपरा आहे.. १२ भाई गणेशाची ही मूर्ती काळ्या मातीपासून बनलेली आहे जी विसर्जित केली जात नाही. मात्र हा मानाचा गणपती आहे.