बीड जिल्ह्यात पुढील तीन तासांत हवामानाचा अचानक बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस कोसळू शकतो. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतका होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वीज पडण्याच्या घटना टाळण्यासाठी शेतकरी, कामगार व ग्रामीण भागातील लोकांनी उघड्यावर जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.