कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने गेलेल्या मराठा आंदोलकांचे काल सरकारच्या निष्क्रीय आणि कपटी धोरणामुळे प्रचंड हाल झाले. आंदोलनासाठी गेलेल्या नागरिकांना मूलभूत सुविधा,अगदी अन्न-पाणीदेखील मिळाले नाही. आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश काळे यांनी आज शनिवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता माहिती देताना सांगितले की,‘‘आम्ही सुरुवातीपासून खाण्या-पिण्याची व्यवस्था स्वतःबरोबर घेऊन जाण्याचे आवाहन केले होते.