लाखनवाडा बुद्रुक शिवारातील झाडाला २३ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना २२ रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. बुऱ्हानपूर येथील जगन हिरालाल बारेला वय २३ वर्ष हा युवक लाखनवाडा बुद्रुक शिवारात मेंढया चारण्यासाठी गेला. होता तो उशिरापर्यंत परत नाल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो जंगलात असलेल्या एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला ही घटना उघडकीस आली असता एकच खळबळ उडाली होती.