न्हावी या गावात चावदस नगर आहे. तेथे तोल काटा आहे. या तोल काट्याजवळ आदित्य तुळशीराम काठोके वय २२ हा तरुण ट्रॅक्टर लावत होता दरम्यान अचानक त्याला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तर याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.