गडचिरोली वरून नागपूरकडे जाणारी शासकीय ॲम्बुलन्स 108 च्या वाहनातील ऑक्सीजन सिलेंडरला आग लागल्याची घटना आज २८ जुन शनिवारला दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान गोडबोरी फाट्याजवळ पेट घेतल्याने एकच खळबळ माजली. या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती त्यामुळे वाहनांच्या दोन्ही भागाने रांगा पहावयास मिळाल्या होत्या. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जिवीतहाणी टळली