रुई येथील राणी सकट व त्यांच्या कुटुंबावर सावकारकी प्रकरणातून व्याज रकमेच्या वादातून हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात राणी सकट यांच्यावर विनयभंगासारखा प्रकारही घडल्याची माहिती असून, संबंधित तक्रार देऊनही हातकणंगले पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात अक्षम्य विलंब केला.या गंभीर प्रकाराचा निषेध करण्यासाठी हातकणंगले तालुका दलित महासंघ आणि मांग-गार्डी समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हातकणंगले पोलीस स्टेशनच्या दारात 'बोंब मारो आंदोलन' करण्यात येणार आहे.