पावसामूळे देसाई विडी कारखान्याला सुमारे ४ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.पावसाचे जवळपास ५ फूट पाणी कारखान्यात घुसल्याने तेंदूपत्ता,तंबाखू,दोरा तयार उत्पादने खराब झाली.सदर कारखान्याने आपत्कालीन विमा उतरविला असून त्याचा लाभ तातडीने मिळवून देण्याची मागणी माजी आमदार आडम मास्तर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली व पालिका आयुक्तांशी फोन संपर्क साधला.