अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आदिवासी इसमाचा काल रात्री १०:३० वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. या हत्येमध्ये इसमाची पत्नी व तिचा प्रियकर असल्याचे समोर आले असून दोघानाही पथ्रोट पोलिसांनी अटक केली आहे. गरजदरी येथील रहिवासी अरविंद सुरतने वय ३७ वर्ष हा पथ्रोट येथील झेंडा चौकात त्याची पत्नी जोष्णा अरविंद सुरतने बाभुळकर यांच्या घरी भाड्याने राहत होता.मृतक याची पत्नी ही अमित मिश्रा या आरोपीच्या घरी स्वयंपाक करायचे काम करत होती. यामधून आरोपी व मृतकच्या पत्नीचे प्रेमसंबंध जुळले.