महामार्गावर मोफत रुग्णवाहिकेचे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने लोकार्पण आज रविवार 14 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता तालुक्यातील देवगाव फाटा येथे करण्यात आले आहे. त्यामुळे अपघातातील जखमीचा जीव वाचण्यास मदत होणार आहे. संस्थानचा हा उपक्रम महत्वाचा असल्याचे ह.भ.प. वैजनाथ महाराज गरड यांनी या प्रसंगी व्यक्त केले.