शिवसेना (उद्धव ठाकरे गट) दिग्रस तर्फे मोर्चा काढून जन सुरक्षा कायदा तातडीने रद्द करण्याचे निवेदन आज दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान देण्यात आले. दरम्यान दिग्रसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जन सुरक्षा कायद्याचा उपयोग करून शासन नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा सह अन्य अधिकार हिरावून घेत असल्याचा आरोप केला.