नागाव येथे ग्रामपंचायतीच्या मार्फत होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतून येणाऱ्या पाण्याला सध्या पेट्रोलजन्य दुर्गंधी येत असून त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या प्रकरणी आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने ग्रामपंचायत आणि विहिरीलगत असलेल्या फरसाण कंपनीला नोटीस बजावली असून, पाण्यामुळे साथीचे रोग पसरल्यास जबाबदार धरण्यात येईल,असा स्पष्ट इशारा दिला आहे.