रक्षाबंधना निमित्त महिला भगिनींने दिलेले आशीर्वाद व प्रेम हा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण आहे. भगिनींनी बांधलेल्या राखीच्या प्रेमाची आणि विश्वासाची जाण ठेवून, उत्साहाने, जबाबदारीने आणि आणखी जोमाने समाजसेवा करण्याची ऊर्जा मला मिळाली आहे.हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतूट राहील. हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील.अशी ग्वाहीअडसड यांनी दिली. यावेळी हजारो संख्येत महिला यांनी आमदार प्रताप अडसड यांना राखी बांधल्या. एका भगिनींनी तर चक्क साडी फाडून राखी बांधली.