दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी अंदाजे 12:30 वाजता मौजे मणेरी नानवली गावच्या हद्दीतील समुद्रकिनारी कोणीतरी अज्ञात इसमाने गैरकायद्याने विक्री करण्याच्या उद्देशाने टाकून दिलेला 11 किलो 966 ग्रॅम वजनाचा ‘चरस’ हा अंमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागला. या अंमली पदार्थांची बाजारमूल्ये तब्बल ₹59 लाख 83 हजार रुपये इतकी असल्याचे समजते.