तळेगाव खुर्द येथील शिक्षकाची बदली ही प्रशासकीय कारणावरून करण्यात आली आहे. दरम्यान मुलीची एकमेव शाळा असून त्या ठिकाणी प्रवीण चिंचोळकर हे खूप चांगल्या प्रकारे मुलांच्या शिक्षणाकडे भर देतात. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी पवार यांनीही प्रशासकीय बदली असून यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही असे म्हटले आहे. तर दुसरीकडे ग्रामस्थ शाळेला कुलूप ठोकणार असंही म्हणत आहेत नेमके कुठली करावी होते हे पाहणे आता महत्त्वाच ठरणार आहे.