नायगाव तालुक्यातील मौजे गोदमगाव येथे दि २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान यातील मयत नामे चंद्रकला बापुराव शिंदे वय ४५ वर्षे ही कपडे वाळु घालणेकरीता घरावरील टिन पत्रावर गेली असता विद्युत शाॅक लागल्याने तीस उपचारकामी सरकारी दवाखाना नायगाव येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी खबर देणार बापुराव शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून आज दुपारी नायगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वाघमारे आज करीत आहेत.