नरंदे येथील संजय यादव कांबळे यांच्या बंद घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बुधवार दि.27 ऑगस्ट रोजी चोरी केली होती.यामध्ये दोन लाख 80 हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते.गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी श्वान पथकाला पाचरण केले होते.स्टेला नावाच्या श्वानाने गल्लीमध्येच लपून बसलेल्या चोराला दाखवले आणि मोठा गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी भागोजी वसंत कांबळे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील बौद्ध समाज मंदिर परिसरातील घटना आहे.