राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांत जमिनी खरडून गेल्या असून पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी एका दिवसात ३०० मिमीपेक्षा अधिक पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज गुरुवारी दि. 28 ऑगस्ट दुपारी एक वाजता इंदापूर येथे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची जोरदार मागणी केली.